Monday, 13 August 2018

आला श्रावण श्रावण




अाला श्रावण श्रावण

अाला श्रावण श्रावण
पाऊस नाही पण वारा घेऊन
हिरवाई आलीच नाही
गेलं रान न रान वाळून

उघडी बोडकी राने
पाही वरच वर
आले तसे निघून जाती
काळे काळे ढग


वेळेचीही वेळ निघून गेली
पाहू नको असा अंत
पक्षीही नाहीत गात गाणी
आता करती आकांत


आला श्रावण श्रावण
ऊन पावसाच्या सरी
असा खेळ फक्त आता
स्वप्नातंच राही


आता येशील मग येशील
यात कितीक गेले दिस
तू आला नाहीस तर
कशी उपजेल कूस


आतूर झालेत सारे
नको घेऊ असे सोंग
धडपडती बाहेर येण्या
थेंबाथेंबातील कोंब


तो चातकही असेल व्याकूळ
ठेवशील का पाण्याविण
ते सारे साठेही कोरडे
कसे भरतील तुझ्याविण


ऎकलं होतं मी
तुझ्या थेंबाने होतात रे मोती
नको आम्हाला ते धन
तू ये फक्त तहान भागवण्यासाठी


कुठं असतात या पावसाच्या सरी
पडत नाहीत कधी धरा
ऊन भरून दिवस कोरडा
नाहीतर असतो भरभर वारा


आला श्रावण श्रावण
नको असा खेळू खेळ
आतातरी कर टपटप
किती अासुसले नयन



कृष्णा

No comments:

Post a Comment