आज पून्हा तू 'तोच' दिसत आहेस...
तेव्हासारखा...
बदलली तुझी कला तरी
रंग तोच आहे...
नेहमीसारखा
कधी फिका तर कधी गर्द
होत आहे प्रकाश तुझा
त्याचासारखा...
रात्र वेगळी असली तरी अंधार तोच आहे...
त्याच्या अस्तित्वासारखा...
श्वास पून्हा वाढत आहे..
नकळत
वेड्यासारखा...
तोच भाव उगवू पाहत आहे..
पून्हा काळोखात...
पहिल्यासारखा..
कधी कळणार या मनाला
तू पून्हा अस्तणार..
मागे खूणा न ठेवता...
भास आभास ही तुझा
वास्तवतेच्या जगात
भरतीओहोटीसारखा...
-©कृष्णा🖋
No comments:
Post a Comment