माझ्या 'बा' ची भाषा
सुट्टी म्हनलं की कामानं पिट्टा पडतू.
लय काम आसतं मला , ह्ये आता तुमास्नी बी म्हायत झालंयच की.
मकंची कणगी मुकळी करुन म्हंजी पयली मका ब्हायर काडून, ती वाळत घालून, कणगी पान्यानं सोच्च धून ती उनाला वाळत घातली.
बाच्या देकरिकीखाली ही मकंची पूती कट्याच्या त्या कडंवरनं सावलीतनं वडून आनून उनात ठिवनं लय बी सल्प न्हाय. बा मनल तसं काम कराव लागतं. काम कसं करायचं ह्ये आपल्याला कितीबी म्हायत आसलं तरी बा च्या मन्न्यापरमानं कराव लागतं. भरलेली पूती उचलताना आगर वडताना पोत्याच्या खूबनीत म्हंजी दोन कोपर्याच्या दोन खाचंत बोटं रुतवून पोतं वडलं की वजं वडाय आवसान येतं. आन् तसंच म्या केलं. मग बा ला जरा बरं वाटलं.
बा ह्येच इसरतू की आपल्याच तालमीखाली पूरगी काम शिकलीय. पन कसं आसतं म्हायताय का, वस्ताद मनंल तसं केलं म्हंजी वस्ताद बी जरा खूस आसतू. मग मला फिराय जायाय रिकामं.
ह्या पोत्यांचं यवडं वजं वडत आनायचं म्हंजी पिट्टाच पडतूय. त्यज्यासाटी दम आसावा लागतू. ज्यला ही काम सल्प वाटतं, त्यनं मका वाळ्ळी की हितं येवाव आन परत हाय तशी पयल्या जाग्यावर ठिवाव, तर म्या मनीन म्या लय न्हाय काम केलं.
मनून म्या मनत आसती की मला लय काम आसतं.
पन तुमास्नी वाटतं म्या फुटू काडत नुसतीच बोंबलत फिरतीय.
आसं कुटं आसतंय व्हय!!!
🫤🫤🫤
✍🏻फुटूवाली मी
कृष्णा



No comments:
Post a Comment